1.ब्रम्हा, विष्णू, महेश आहेत त्रिमूर्ती, _____रावांची पसरो जगभर किर्ती.
2.शिवाच्या पिंडीवर गंगेची धार, __________रावांचे नाव घेते आज आहे_____वार.
3.शिवाच्या पिंडीवर वाहते बेलाचे १०८ पान, _______रावांचे नाव घेते ______ गाव आहे छान.
4.शिवावर बेल वाहते १०८,_______रावांचे नाव घेते रोज वाचावा हरिपाठ.
5.शिवाच्या पिंडीवर करते पंचामृताचा अभिषेक, ______रावांचे नाव घेते आहे______ची लेक.
6.महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकुन
…नाव घेते सर्वाच मान राखून
7.लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा, …च्या जीवावर कर्ते मी मजा.
मराठी गणपती उखाणे
8.चतुर्थी ला वाहते गणपती ला २१ हराळी, _____रावांचे नाव घेते वैज्यनाथाचे गाव आहे परळी.
9.गणपतीला लावली होती हत्ती ची सोंड, _____रावांचे नाव घेते ब्रम्हा देवाला आहेत तीन तोंड.
10.श्री गणेश आहे शिव पार्वती चा पुत्र,______रावांंच्या नावाचे घालते मंगळसुत्र.
11.कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुन ..नाव घेयला सुरवात केली आजपासून
12.साई बाबा चा मंत्र आहे ओम साई, _______रावांचे नाव घेते करू नका घाई.
13.पिंपळाच्या वृक्षामध्ये आहे विष्णू लक्ष्मी चा वास, ______रावांचे नाव घेते तुमच्या साठी खास.
14.महर्षी वाल्मीकी ने रचले रामचरीत्र,______ रावांचे नाव घेते राम आहे कौसल्येचा पुत्र.
15.पहिला मराठी महिना आहे चैत्र, ______रावांचे नाव घेते सुदामा कृष्ण होते जिवलग मित्र.
16.जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास …रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास
श्रीकृष्णाचे उखाणे | uKHANE ON kRISHNA:
17.सत्यनारायणाच्या पुजेत ठेवते श्रीकृष्ण, _____रावांचे नाव घेते, स्त्रियांना उखाणा घेण्यासाठी पडतो मोठा प्रश्न.
18.“श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य. आणि माझ्या संसारात होईल तुम्हा सगळ्यांचे नेहमी आदरातिथ्य.”
19.“अर्जुनाच्या रथाचे श्रिक्रुश्न करतो सारथ्य —-च्या ससारात होइल सर्वाचे आदरतिथ्य.”
20.“गीत गोविंदा श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास …चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास.”
21.“श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार….. सह केले मी हरिद्वार.”
22.“अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण करतो सारथ्य सोबत… करतो तुम्हा सगळ्यांचे आतिथ्य.”
23.“भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ… रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ.”
24.“संतांचे वाङमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर… आहेत प्रेमाचा आगर.”
25.“श्रीकृष्णाने लिहिली भगवतगीता …माझे राम तर मी त्यांची सीता.”
26.“श्रीकृष्णाने भगवतगीतेतून जगाला केला उपदेश…नी माझ्या जीवनात केला २७ मे ला प्रवेश.”